घराबाहेर पडणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी रशियाने ५०० सिंह रस्त्यावर सोडले नाही

सोशल मीडियावर खूप साऱ्या जणांनी एक ग्राफिक कार्ड शेअर केली आहे. ज्यात टीव्हीची स्क्रीन दिसत असून त्यात एक सिंग दिसत आहे. सध्या करोना व्हायरसला रोखणे हे अनेक देशांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे लॉकडाऊन असताना जे लोक घराबाहेर पडत आहे, त्यांना रोखण्यासाठी रशिया सरकारने ५०० सिंह रस्त्यावर सोडले आहेत, असा दावा यातून करण्यात येत आहे.

या ग्राफिक कार्डवरील मजकुरात लिहिलेय की, रशियाने जवळपास ५०० हून अधिक सिंह रस्स्त्यावर सोडले आहेत. लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक घराबाहेर पडत आहे. त्यांना रोखण्यासाठी रशिया सरकारने हे पाऊल उचललं आहे. ब्लादिमीर पुतीन यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे.